फटाक्यांच्या भीषण स्फोटात ३ जणांचा मृत्यू, १५-२० जण जखमी

Spread the love

हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा असल्याने आगीसोबत जोरदार स्फोट होऊ लागले. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आग विझविताना फटाक्यांच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात गोपाल बासटवार यांचे घर आणि गोदाम आहे. बासटवार हे फटाक्यांचे ठोक विक्रेते असल्याने त्यांच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा करण्यात आला होता. सोमवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान गोदामातून अचानक धूर निघू लागला. काही वेळातच गोदामाला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. अग्नीशमन वाहन जळाले मात्र त्यामुळे अनेकांचे जीव वाचले प्रत्यक्षदर्शींची माहिती. अनेकांनी वेळीच सहकार्य केल्याने अनर्थ टळला म्हणता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *