भव्य दिव्य पार्थिव शिवलिंग पुजन व शिवलीलामृत पारायण निमित्त बैठक संपन्न

Spread the love

श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठाणचे कार्यक्रमाचे तीसरे वर्ष – संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत पाठक

हिंगोली – शहरातील श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्यावतीने पार्थिव शिव लिंग पुजन व शिवलीलामृत पारायणचे आयोजन करण्यात आले आहे. 2024 मध्ये पारनेरकर मंदिरात कार्यक्रम संपन्न झाला मागील वर्षी शिवाजीराजे उद्या न येथे आई जगदंबा नवरात्र उत्सव व श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठाण संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या वेळी देखील महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती .या वर्षी देखील पुण्य पावन श्रावण महिन्यात व विशेष म्हणजे भौमप्रदोषाचे औचित्य साधून दि. 25 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 11 ते 4 शिवलीलामृत पारायण व सायंकाळी 6 वाजता पार्थिव शिव लिंग पुजन करण्यात येणार आहे. शिवलीलामृत पारायण होणार आहे या निमित्ताने आढावा बैठक संपन्न झाली आहे या मध्ये पुर्व नांव नोंदणी आवश्यक असल्याचे ठरविण्यात आले व या वेळी महिला प्रमुख म्हणून मृणाली पत्की यांची निवड करण्यात आली तसेच कार्यक्रमानिमित्त विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. शेतकरी भवन मंगळवारा बाजार परीसर हे कार्यक्रमाचे ठिकाण असणार आहे सर्वांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. पाऊस असतांना देखील मोठ्या प्रमाणात बैठकीला उपस्थित होती या वेळी लक्ष्मीकांत पाठक,राजकुमार घन धोंडीराज पाठक, राजु गुरू शुक्ल, खंडू गुरू उन्हाळे, गोविंद गुरू दलाल , संजय मेथेकर,संगीता ऋषी , मृणाली पत्की, कौशल्या गारे, उज्वला कहाकरकर, दिपाली शुक्ल दिपाली घन योगीता जोशी, आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *