
–ध्येय अंतिम ठेवा..यश, अपयश पदरी असते त्याची निराशा न करता आपले ध्येय अंतिम ठेवा यश आपोआप येईल. त्यासाठी परिश्रम करावे लागेल.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बंगार यांनी सत्कार केला.
हिंगोलीच्या वैभव काळेची अमेरिकेच्या अमेझॉन कंपनीत निवड हिंगोलीच्या शीरपेच्यात मानाचा तुरा : 10 नोव्हेंबरला होणार रुजूहिंगोली- शहरातील गोविंदनगर येथील वैभव काळे याची अमेरिकेच्या अमेझॉन कंपनीत नियुक्ती झाली असून तो साता समुद्रापार जाणारा शहरातील पहिलाच विद्यार्थी असून हिंगोलीचे नाव लोकीकात भर पाडली आहे. त्याच्या नुकताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बंगार यांनी सत्कार केला.मुळात वैभवचे कळमनुरी तालुक्यातील माळ धामणी हे गाव आहे. त्याचे वडील हे पोलीस दलात नोकरीला असल्यामुळे त्यांनी गोविंद नगर येथे राहावयास आले. आता ते आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवत करियर करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार वैभव हा मुळात हुशार असल्याने त्याने कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील केंद्रीय शाळेत आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने हिंगोली येथील सेक्रेट इंग्लिश स्कुल येथे दहावीचे धडे गिरविले त्यानंतर त्याने पुढे अभियंता होण्यासाठी राजस्थान येथील कोटा येथे प्रवेश घेत जेईची तयारी त्याने पूर्ण केली. बारावीत त्याला चांगले मार्क मिळाल्याने तो इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इनफॅमेशन टेकनॉलॉजि पुणे येथून बिटेक पूर्ण केला. त्यानंतर कॅम्पस मधून त्याची एफआयएस साठी ग्लोबल मध्ये एक वर्षासाठी नियुक्ती झाली. त्यानंतर त्याने समोरचे ध्येय ठेऊन पुढे काहीतरी व्हावे याचा अभ्यास करीत असताना एक ऑनलाईन जाहिरात प्रकाशीत झाली. त्यात त्याने करियर साईट वरती जाऊन अर्ज केला. त्यात त्याला फस्ट राऊंड मध्ये ऑनलाईन असिसमेंट परीक्षा द्यावी लागली त्यात तो उत्तीर्ण झाला.त्यानंतर तिसरी टेस्ट घेण्यात आली त्यात तो उत्तीर्ण झाल्याने वैभवची निवड झाली. आता वैभव हा 10 नोव्हेंबर रोजी आपल्या अमेरिकेतील अमेझॉन कंपनीत रुजू होणार असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या यशात त्याचे वडील विठ्ठल काळे, आई उषा काळे, भाऊ विवेक काळे यांचा सिंहाचा वाटा आहे. ही माहिती समजताच आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे तसेच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वैभव काळे याचा सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.