
जिल्ह्यात
३.९ रिश्टर स्केलची नोंद; पांगरा शिंदे भुकंपाचे केंद्र
जिल्ह्यात कळमनुरी
वसमत, औंढा नागनाथ तालुक्यात अनेक गावांत २५ ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी ३.३६ वाजता भुकंपाचा धक्का बसला रिश्टर स्केलवर ३.५९ ची नोंद झाली आहे. या भुकंपाचे केंद्र वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे होते. या धक्यामुळे गावकरी भयभीत झाले होते. मात्र कुठेही हानी झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून भुकंपाचे धक्क्के अधूनमधून जाणवत आहेत आतापर्यंत अनेक वेळा जिल्ह्यात भुकंपाचे धक्के जाणवते आहेत.
शिंदे, सापटी, कुमटी, सिरकी, गिरगाव आदी गावांत हा भूकंप जागवला औंढा नागनाथ तालुक्यात पिंपळदरी, आमदरी, तर कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, पोतरा, सिंदगी, नांदापुर, खेडेगाव, हारवाडी आदी गावांत भुकंपाचे धक्के जाणवले यामुळे गाठकरी भयभीत झाले होते जमिनीतून आवाज येताच गावकरी घराबाहेर पडले होते यामुळे मात्र कुठे कोणतीही हाणी झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आहे.
रामेश्वर तांडा परिसरात सौम्य धक्के, कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३६ मिनीटांनी भुकंपाचे सौम्य धक्के जानवले रामेश्वर तांडा परिसराग्रह दांडेगाव, डियस बुद्धक, रामेश्वर गाव सालापुर, कोपरवाही, बोथी आदी भागात भुकंपाचा हादरा बसला होता. या पूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यावेळी घराचे मोठे नुकसान झाले होते. परंतु शासनाची कोणतीच आर्थिक मदत देण्यात आली नव्हती. आता पुन्हा या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जानवले आहेत, यामुळे ग्रामस्थात भिती निर्माण झाली आहे