
धोंडीराज पाठक हिंगोली :जिजामाता बहुउद्देशीय सेवाभावी व शिक्षण संस्था, हिंगोली द्वारा संचलित सुखदेवानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,भांडेगाव येथील वरिष्ठ लिपिक प्रद्युम्न गोविंदराव हजारे यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक व आदर्श सेवेला गौरव देण्यासाठी आयोजित सपत्नीक सेवागौरव व सेवापूर्ती सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस ग्यानदेवराव जगताप होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे उपाध्यक्ष उत्तमराव जगताप, शाळा समिती अध्यक्ष तथा संचालक संतोषराव जगताप, सहचिटणीस श्री. प्रकाशराव निरगुडे, मुख्याध्यापक श्री. गजानन वैद्य,पर्यवेक्षक श्री.दत्ताराव ढोबळे,सुखदेवानंद विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक माधव कोरडे ,अन्नपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब इंगोले,भांडेगाव येथील उपसरपंच शिवप्रसाद जगताप,पाणीपुरवठा अध्यक्ष श्री आनंदराव जगताप,एकनाथ महाराज, इतर पदाधिकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री. हजारे यांचा पूर्ण आहेर,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सेवागौरव मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात श्री.प्रद्युम्न हजारे यांनी संस्था, सहकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सह त्यांच्या पत्नीने दिलेले सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला.उपस्थितांनाही हा क्षण भावूक करणारा ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन काळे सर यांनी केले,तर विठ्ठल कोल्हाळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, स्नेहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.