
हिंगोली – प.पु माधवानंद महाराज दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ च्या दरम्यान हिंगोली मार्गाने उमरखेड येथे जात असताना हिंगोलीतील तुकाराम महाराज मठ झालेल्या विकास कामांचा आढावा घेत तुकाराम महाराज पादुका दर्शन त्यानंतर श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती दर्शन व राम मंदिर दर्शन घेत प.पु. माधवानंद महाराज येहळेगांव तुकाराम या मार्गाने उमरखेडकडे रवाना झाले या वेळी मोहन आष्टीकर , विश्वांभर जोशी , रामकृष्ण बेरळकर, दिनेश महाजन, रमेश जोशी यांच्यासह धोंडीराज पाठक, विजय घन, संतोष उन्हाळे, प्रवीण ढवळे, सचिन घन , गोविंद दलाल, सागर घन, इंचेकर, बालाजी जोशी, चैतन्य कुडे, शामराव घन, अमीत दमकोंडेवार, खुडजकर, लांबडे, सौंदनकर आदिंची उपस्थिती होती या वेळी ज्योतीषाचार्य वेदमूर्ती लक्ष्मीकांत पाठक यांनी महाराजांचे दर्शन घेत शाल श्रीफळ देत यथोचित सन्मान केला.