पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

Spread the love

७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ

हिंगोली,

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा समारंभ हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न न औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे सोमवार, दि.२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता होणार आहे.

सकाळी ९.३५ ते ९.५० या वेळेत पोलीस परेड व चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १०.१० ते १०.२५ या वेळेत पालकमंत्री श्री. झिरवाळ हे स्वातंत्र्य सैनिकांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहेत. मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमापूर्वी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये वा आस्थापनांतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करावा.

तरीही सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *