
हिंगोली – बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या आदर्श प्रि प्रायमरी स्कुल येथे शनिवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे आवचित्य साधून बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य सुवराणा रामपूर कर यांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयश्री बोरकर, छाया निरगुडे, रुपाली बेंगाळ, माधुरी राऊत आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले.