
हिंगोली- तालुक्यातील जवळा-पळशी रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून वाहन धारकांना नाहक त्रास होत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी लोकप्रतिनिधीना वेळ मिळत नाही. याकडे संबधित विभागही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
जवळा पळशी मार्गावार अनेक गावे असून या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यासह नागरिकांना हिंगोली कडे येण्या जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. हिंगोली हे मुख्य जिल्ह्याचे केंद्र असल्याने या ठिकाणावरून दळण वळण केले जाते. हा रस्ता संबंधित गुत्तेदाराने थातूर मातुर काम केल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. हा रस्ता कोणत्या विभागाकडून करण्यात आला त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.