राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पत्रकारांच्या नावे लाखोची वसुली

Spread the love

भोंगळ कारभार

(भाग 1)

हिंगोली – दीपावली निमितत्याने पत्रकार जाहिरातीसाठी येत असतात. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहिरातीच्या नावाखाली लाखो रुपयांची माया गोळा केली. अन पत्रकारांना केवळ पाचशे ,हजाराची नोट देऊन बोळवन केल्याच्या धकादायक प्रकार आज उघडकीस आल्याचे नाव न घेता एका पत्रकाराने सांगितले.

दर वर्षी प्रमाणे यंदाही शेकडो पत्रकारांनी आपले आरो कार्ड या विभागाला दिले. यात मुख्य पेपर असतील तर काही बोगस आरो कार्ड घेऊन दीपावलीच्या नावाखाली गौरख धंदा चालवला आहे अश्याची खात्री न करता राज्य उत्पादन शुल्क विभाग मांजरी प्रमाणे डोळे मीटवून ज्यांचे पेपर येत नाही अश्या शेकडो पत्रकारांना खिरापत वाटली आहे. हा पैसा कुठून गोळा असा संशय ही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, राज्य उत्पादन विभाग हा राज्य शासनाला महसूल गोळा करून देण्यात अव्वल विभाग आहे. त्या खालोखाल महसूल, त्यानंतर इतर विभागाचा क्रमांक लागतो. परंतू राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारू विक्री दुकानाचे परवाने, मंजूर करणे, रिनिवल करणे, बियर शॉपी परवाने, परमिट हॉटेल आदी साठी लाखो रुपयांची देवाण घेवाण केली जाते, यासाठी शासनाचे नियम धाब्यावर ठेवून तडजोड करून मनमानी कारभार केला जातो. तसेच या व्यतिरिक्त अवेध्य दारू विक्री, मोहाची दारू विक्रीचे ठेके माहिती असताना रेड मारली जात नाही, कारण हप्ते वसुली हे मोठे कारण आहे. केवळ पोलीस विभागाने धाडी मारल्यानंतर एकदोन केसेस करणे हे या विभागाचे औपचारिक काम आहे. लाखो रुपयांची कमाई असलेल्या विभागातील अधिकारी, कर्मचारी बदली न करण्यासाठी वाटेल ते पैसे मोजा यला तयार असतात. मागील काही वर्षांपूर्वी याच विभागातील एका अधिकाऱ्यांस लायसन्स साठी लाच घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून अटक केल्याची घटना घडली होती. तरीही या विभागातील अधिकाऱ्यांना काही देणे घेणे नाही.

दीपावली निमित्य पत्रकारांना जाहिरात द्यावी लागते यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अनेक दारू दुकाने, धाबे, परमिट बार कडून धमक्या देऊन लाखो रुपये गोळा करतात आणि जमा झालेल्या पैस्यातून केवळ पत्रकारांना पाचशे, हजार रुपये देऊन मोकळे करतात आणि उरलेली रक्कम गायब करतात हा त्यांचा गौरख धंदा झालेला आहे. धाबे वाले, किंवा परमिट, अवेध्य दारू विक्रेते यांनी भीती पोटी आपला हिस्सा अधिकाऱ्यांना देतात. हे तर सोडा काही जणांचे महिन्याला हप्ते ठरलेले असतात हप्ते दिले नाही कि कारवाईची धमकी देऊन पैसे उखळत असतात असा हा प्रकार सुरु आहे. याकडे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी या कारभाराची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *