
हिंगोली,चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड व तुकाराम महाराज संस्थान येहळेगाव तसेच हिंगोली शहरातील राम मंदिर ,व तुकाराम महाराज मठ मठाधिपती प. पु. माधवानंद महाराज दि. 15 नोव्हेंबर रोजी हिंगोलीत येणार आहेत. हिंगोली करांसाठी हि पर्वणीच आहे. प. पु. माधवानंद महाराज यांचा 16 तारखेला हिंगोली येथील राम मंदिरात कार्यक्रम होईल व त्यानंतर नर्सी नामदेव कडे प्रस्थान करून नर्सी नामदेव येथे तीन दिवस धार्मिक कार्यक्रम व अन्नदान करण्यात येईल त्यामध्ये पुढील प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. या मध्ये विश्वांभर दर्शन दुपारी 12.30 च्या दरम्यान व संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान होणार आहे. विश्वाभंर म्हणजे संस्थानचे आराध्य दैवत आहे ज्या मध्ये १२ ज्योतीर्लीग दि16 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक पुडीचा कार्यक्रम हिंगोली शहरातील राम गल्ली परीसरातील राम मंदिरात होणार असून समोरच असलेल्या कृष्ण मंदिर येथे महाप्रसाद पार पडणार आहे तरी सर्व गुरुबंधूनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.