जिल्हा परिषदेत सकाळी ८.०५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Spread the love

हिंगोली,

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा गणराज्य दिन सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद, हिंगोली येथे सकाळी ८.०५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृध्दी दिवाणे यांनी केले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या या गौरवपूर्ण प्रसंगी राष्ट्रीय पोशाख परिधान करून देशभक्तीची भावना व्यक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *