आशा सेविका पद भरती संदर्भातील महिलांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

Spread the love

सेनगाव नगरपंचायतच्या ठरावानुसार पात्र ठरलेल्या आशा सेविका पदाच्या नियुक्त्या मुद्दामहुन थांबविल्या गेल्याचा आरोप करीत पात्र झालेल्या महिलांनी दि.११ डिसेंबर गुरुवार पासुन सेनगाव तालुका आरोग्य कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली होती.दुसऱ्या दिवशी दि.१२ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साखरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ.वसंत पाटील यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्युस घेत अमरण उपोषण मागे घेतले आहे.

सेनगाव नगरपंचायतचा ठराव क्र.११२,विषय क्र.३अंतर्गत पाच महिलांना आशा सेविका पदासाठी पात्रता देण्यात आली होती.तसेच हिंगोलीचे पालकमंत्री ना.नरहरी झिरवाळ साहेब,राज्याच्या आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह आरोग्य संचालक व उप संचालक यांच्या आदेशानंतर ही पात्र आशा सेविकांची नियुक्ती न झाल्याने महिलांमध्ये कमालाची नाराजी होती‌.पात्र महिलांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्याचे वरीष्ठांचे आदेश असतांना देखील स्थानिक पातळीवर नियुक्ती प्रक्रीया थांबवुन ठेवण्यात आल्याचा आरोप संबधीत महिलांनी केला होता.या अनुषंगाने दि.५ डिसेंबर शुक्रवार रोजी हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे संबधीत महिलांनी लेखी निवेदनाद्वारे १० डिसेंबर पर्यंत नियुक्ती आदेश न झाल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा देऊन देखील आरोग्य प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दि.११ डिसेंबर पासुन सौ.रुखिया परविन परविन मोहसिन सय्यद,सौ.विमल शामराव गाढवे,सौ.नंदा प्रकाश तनपुरे,सौ.सारीका शुभम तिडके व श्रीमती अनुसया मारुती हजारे यांनी अमरण उपोषणाचा मार्ग निवडला होता.आम्हाला जोपर्यंत नियुक्ती आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण चालुच ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने आज दि.१२ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साखरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ.वसंत पाटील यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेत पंधरा दिवसामध्ये नगरपंचायत अंतर्गत रिक्त आशा सेविकांची पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर दोन दिवसापासुन चाललेले अमरण उपोषण मागे घेतले आहे.यावेळी अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष पंडीत अण्णा तिडके,माजी सभापती आप्पासाहेब देशमुख,नगरसेवक वैभव देशमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *